बातम्या

कोल्हापुरात शरद पवार हे मोठा राजकीय खेळ खेळण्याच्या तयारीत..

Sharad Pawar is preparing to play a big political game in Kolhapur


By nisha patil - 6/29/2024 7:31:52 PM
Share This News:



 सध्या राष्ट्रवादीचे शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असून कोल्हापुरात मोठा राजकीय डाव रंगण्याची चर्चा सुरू आहे. कारण कोल्हापुरात येतात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ए वाय पाटील यांनी शाहू महाराजांना पाठिंबा देत अजित पवारांची साथ सोडण्याची संकेत दिले होते मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ए.वाय पाटील यांनी पवार यांची भेट घेतल्याने शरद पवार अजित पवार यांना धक्का देणार का? असा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडला आहे.दरम्यान ए.वाय पाटील हे विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी उत्सुक होते. पण त्यांची काँग्रेसशी जवळीक वाढल्यानंतर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे जर काँग्रेसशी नाही जमले तर ए.वाय पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊ शकतात. अशी शक्यता रंगल्याने राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आले आहे.


कोल्हापुरात शरद पवार हे मोठा राजकीय खेळ खेळण्याच्या तयारीत..