शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठाने प्रात्यक्षिक परीक्षेचे शुल्क निश्चित केले
By nisha patil - 3/18/2025 5:56:08 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठाने प्रात्यक्षिक परीक्षेचे शुल्क निश्चित केले
नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क लागू
विद्यापीठाने विद्यार्थ्यांना शुल्काबाबत माहिती देण्याचे केले आवाहन
शिवाजी विद्यापीठाने आपल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रात्यक्षिक असलेल्या कोर्सेससाठी प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क निश्चित केले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालकांनी सर्व अधिविभाग व संलग्न महाविद्यालयांना याबाबत परिपत्रक काढले आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार, जे कोर्सेस प्रात्यक्षिक असतील, त्यासाठी प्रति विद्यार्थी २० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
शिवाजी विद्यापीठाने प्रात्यक्षिक परीक्षेचे शुल्क निश्चित केले
|