बातम्या
कळंबा कारागृहात "जीवन गाणे गातच जावे" कार्यक्रम संपन्न
By nisha patil - 3/25/2025 2:56:13 PM
Share This News:
कळंबा कारागृहात "जीवन गाणे गातच जावे" कार्यक्रम संपन्न
कारागृह हे सुधारगृह असून यातून आदर्श नागरिक व्हावेत -जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर, दि. 25 : जीवन जगताना हातून चूक घडल्याने कारागृहात बंदीजनांना शिक्षा व प्रायश्चित करावे लागते. कारागृह हे सुधारगृह असून येथील बंदीजनांनी आदर्श नागरिक व्हावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, कळंबा येथील सांस्कृतिक कार्य संचालनालय व कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम 'जीवन गाणे गातच जावे' हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक एन. जी.सावंत, अतिरिक्त अधीक्षक विवेक झेंडे, सांस्कृतिक संचालनालयाचे रोहित पाटील, कारागृहातील पोलीस अधिकारी व बंदीजन आदी उपस्थित होते.
.%5B6%5D.jpg)
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अधीक्षक एन. जी.सावंत यांनी कारागृह हे बंदीजणांना सुधारणा व जीवनमान बदलण्यासाठी असून यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे सांगितले.
महाराष्ट्र राज्यातील 36 कारागृहामध्ये आज एकाच वेळी सांस्कृतिक कार्यक्रमातून कारागृहातील बंदीजनांना समाजातील मुख्य प्रवाहात आणणे, देशप्रेम, प्रबोधन, बंधुभाव, मार्गदर्शनासाठी आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
.%5B11%5D.jpg)
या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध गाणे व नृत्य कौशल्याचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत आयरेकर व आभार एकनाथ वायकुळे यांनी मानले.
कळंबा कारागृहात "जीवन गाणे गातच जावे" कार्यक्रम संपन्न
|