शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठात ‘स्पार्क’ चित्रपट महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By nisha patil - 2/27/2025 6:18:32 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठात ‘स्पार्क’ चित्रपट महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. फिल्म मेकिंग अभ्यासक्रमांतर्गत आयोजित दोन दिवसीय ‘स्पार्क’ चित्रपट महोत्सवाला आज प्रारंभ झाला. उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेच्या वाटा जाणतेपणाने चोखाळाव्यात, असे आवाहन केले.
महोत्सवात राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लघुपट आणि माहितीपटांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘मेटाफोर’ लघुपटाला विशेष दाद मिळाली. उद्घाटन सत्रात डॉ. शिवाजी जाधव, अनुप जत्राटकर आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठात ‘स्पार्क’ चित्रपट महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
|