बातम्या

तेज कॉम्पुटर इन्स्टिट्यूटचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा उत्साहात संपन्न

The annual convocation of Tej Computer Institute concluded with enthusiasm


By nisha patil - 6/24/2024 9:54:31 PM
Share This News:



उजळाईवाडी , कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी नेहमीच तेज कॉम्पुटर इन्स्टिट्युट अग्रेसर असते.२3 जुन २०२४ रोजी  तेज कॉम्पुटर इन्स्टिट्यूटच्या  सारथीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा उजळाईवाडी येथील समर्थ सांस्कृतिक हॉल येथे संपन्न झाला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारथी च्या विद्यार्थींनी क्षितिजा दळवी व दीप्ती जाधव यांनी केले . उजळाईवाडी ग्रामपंचायत सरपंच श्री . उत्तम आंबवडे सर , उपसरपंच सौ.  प्रतिभा पोवार मॅडम तसेच श्री हरी कॉम्पुटरचे  प्रमुख हिरवे सर या प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली . यानंतर तेज कॉम्पुटर इन्स्टिट्यूटची विद्यार्थ्यांनी सौजण्या बाबर हिने  कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली . यानंतर कार्यक्रमाचे आयोजक श्री . राजेंद्र चोरगे सर व सौ .स्नेहल चोरगे मॅडम यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यांत आला .
 

तेज कॉम्पुटर इन्स्टिट्यूट मध्ये आयोजित केलेल्या प्रेझेंटेशनच्या झालेल्या अटातटीच्या स्पर्धे मध्ये विजेते ठरलेल्या उजळाईवाडी मधून  स्वरूप कदम ,दिव्या दळवी व सोहन मातले व तामगाव मधून अमेय पाटील,गायत्री कळेकर, साक्षी बच्चे व  सोहम  गुरव या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. 
या कार्यक्रमामध्ये उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव येथून आलेल्या मुलामुलींच्या टीमने सहभाग घेतला होता. "FRIENDS CLUB" ने झालेल्या प्रत्येक खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत,शेवटपर्यंत वर्चस्व ठेवले व प्रथम क्रमांक पटकावला. मुलींच्या संघामध्ये "CRAZY GIRL'S" या ग्रुपने उत्कृष्ट कामगिरी करत मुलींच्या संघामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

 

 स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी  नृत्य, लावणी , नाटक , एकाकिंका असे विविध कार्यक्रमांमध्ये  उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन अदिती माने, वर्षा खामकर, दिव्या दळवी, नम्रता माने, साक्षी धोत्रे, श्रुती मोरे,सोनाली गडकरी,स्नेहल बागणे, सरोजिनी मगदुम,शितल कुंभार या विद्यार्थिनींनी केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे आभार  वैभवी पाटील हिने मानले. अशा पद्धतीने उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला झाला.


तेज कॉम्पुटर इन्स्टिट्यूटचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा उत्साहात संपन्न