बातम्या

आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहील... - उद्धव ठाकरे

Udhv balasaheb thakre


By nisha patil - 7/31/2024 4:40:47 PM
Share This News:



विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच राजकीय नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि भाजप गेल्या काही दिवसांपासून आमने-सामने आहे.

त्यातच, शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस एकमेकांवर व्यक्तिगत हल्ले करताना दिसून येते. आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला. आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे डाव खेळत होते, हे मला अनिल देशमुख यांनी सांगितले. आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहील, अशा शब्दांत उद्धव ठाकरे  यांनी फडणवीस यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर भाजपनेही पलटवार केला आहे. फडणवीसांच्या दोन शिलेदारांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भाजप आरे ला कारे करेन, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर, सुधीर मुनगंटीवार यांनीही महाभारतातील कौरवाची उपमा दिलीय.  

             

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध थेट 'आर या पारची' भूमिका घेतल्याने आगामी काळात ठाकरे गट आणि भाजपमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आता भाजपनेही पलटवार केला आहे.

''मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, नाशिकच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे होते, मुंबईच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे होते. आता तर त्यांनी काय म्हटलं, मी मुस्लीम मतं, ख्रिश्चन मतांच्या जीवावर फडणवीसांना बघून घेईल, भाजपला बघून घेईन, त्यांच्या नेत्यांना बघून घेईल, त्यांच्या अंगावर जा. ही चिथावणी तुम्ही कोणाला देता, कोणाच्या भरोशावर देता, असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच, राज्यात धारावीसारखे हत्याकांड होत आहेत. उद्धव ठाकरेंना ही चिथावणीची भाषा शोबत नाही, हे राज्य संस्कारमय राज्य आहे. या राज्यात जाती-पातीचं राजकारण करुन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम आज तुम्ही केलंय. या राज्यात हिंदू-मुस्लीम समाज कधीही वेगळा राहत नाही, पण तुम्ही समाजाचं ध्रुवीकरण करत आहात, यावर आमचा आक्षेप आहे.''


आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहील... - उद्धव ठाकरे
Total Views: 22