बातम्या

विवेकानंद मध्ये एन.सी.सी. छात्रांचा सत्कार

Vivekananda in N C C Congratulations to the students


By nisha patil - 6/27/2024 3:12:40 PM
Share This News:



कोल्हापूर दि.27 :  येथील विवेकानंद महाविद्यालय व 6 महाराष्ट्र गर्ल्स् बटालियन, कोल्हापूर येथील ऑफिसर छात्र कु. श्रेया देसाई हिची नौदल सेनेमध्ये ऑफिसर ट्रेनिंग साठी निवड झाली.

तसेच ज्युनिअर अंडर ऑफिसर शरयू सुतार (एन.सी.सी. उत्कृष्ठ छात्रा) कॉर्पोरल ऐश्वर्या पवार व कार्पोरल सहिता बारसकर यांना कॅडेट वेलफेअर स्कॉलरशिप मिळाली. त्याबद्दल विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या हस्ते  वरील छात्रांचा सत्कार करण्यात आला.  एन.सी.सी. छात्रांच्या या यशाबद्दल श्री विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे,  सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे , महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग यांनी अभिनंदन केले.  वरील सर्व छात्रांना लेफ्टनंट जे.आर.भरमगोंडा, कॅप्टन सुनिता भोसले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.  याप्रसंगी  एन.सी.सी. छात्र , प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.


विवेकानंद मध्ये एन.सी.सी. छात्रांचा सत्कार