बातम्या

विवेकानंद मध्ये श्री बी. एस. गायकवाड यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न

Vivekananda in Shri B S Gaikwad s retirement goodwill ceremony concluded


By nisha patil - 1/7/2024 12:46:09 PM
Share This News:



कोल्हापूर दि.1 :  श्री. बी. एस. गायकवाड यांनी 32 वर्षे सेवा प्रामाणिकपणे पार पाडली आहे.  त्यांनी संस्थेशी एकनिष्ठ राहून समाजाप्रती मी देणे लागतो या भावनेने आपली सेवा बजावली आहे. सेवानिवृत्ती कार्यक्रम हा एक भावनिक क्षण आहे.  आपणास दिलेले काम प्रामाणिकपणे पार पाडले तरच असा सेवानिवृती सदिच्छा समारंभ होतो.  सेवानिवृती नंतरचे जीवन आरोग्यपूर्ण व्हावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.  असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे यांनी केले.  ते  श्री. बी. एस. गायकवाड यांच्या सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना  केले.   अध्यक्षस्थानी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार  हे होते.

याप्रसंगी विवेकानंद कॉलेजच्या प्रशासकीय स्टाफतर्फे  श्री बी.एस.गायकवाड  यांचा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ् देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.

अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार म्हणाले, श्री. बी.एस.गायकवाड यांची आपल्या कामावरील व संस्थेवरील श्रध्दा कौतुकास्पद आहे.  दिलेले काम प्रामाणिकपणे पार पाडणे ही त्यांची एक महत्वाची ओळख आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांना आरोग्यपूर्ण व सुखासमाधानाचे  आयुष्य लाभावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.

            सत्काराला उतर देताना श्री बी.एस.गायकवाड यांनी संस्थेने व महाविद्यालयाने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.व सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला.  कार्यक्रमाची सुरुवात संस्था प्रार्थनेने झाली.  प्रास्ताविक व स्वागत श्री. हितेंद्र साळुंखे, प्रशासकीय कर्मचारी प्रतिनिधी यांनी केले.  कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. आर. बी. जोग यांनी मानले. सुत्रसंचालन महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ.सौ.नीता पाटील यांनी केले.  याप्रसंगी श्री सागर कांबळे व नातेवाईकांनी मनोगत व्यक्त्‍ केले. या कार्यक्रमास प्राध्यापक व प्रशासकीय वर्ग उपस्थित होता.


विवेकानंद मध्ये श्री बी. एस. गायकवाड यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न