बातम्या

शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जोमाने कामाला लागा : राजेश क्षीरसागर

Work hard to restore Shiv Sena s past glory Rajesh Kshirsagar


By nisha patil - 5/7/2024 7:11:47 PM
Share This News:



शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांची शिवसेना शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे मुख्यमंत्री.एकनाथ शिंदे  यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करत आहे. मुख्यनेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेस राज्यभरातील जनतेतून उदंड प्रतिसाद मिळत असून त्याचा परिपाक महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेनेने घवघवीत यश संपादित केले आहे.

शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढल्याचेही निकालात स्पष्ट दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे. त्यामुळे शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी नियोजनबद्धरित्या जोमाने कामाला लागा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. शिवसेना पक्षाच्या जिल्हास्तरीय विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, उत्तर शहरप्रमुख रणजीत जाधव, दक्षिण शहरप्रमुख महेंद्र घाटगे, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, महानगरसमन्वयक पूजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, शिव उद्योग सहकार सेना शहरप्रमुख मंगलताई कुलकर्णी, युवती सेना शहरप्रमुख नम्रता भोसले, पूजा कामते, सुनिता भोपळे, प्रीती अतिग्रे, राधिका पारखे, सना शेख, पूजा आरदांडे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, तुकाराम साळोखे, उदय भोसले, अनुसूचित जाती सेना जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, शहरप्रमुख प्रभू गायकवाड, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, फेरीवाले सेना शहरप्रमुख विजय जाधव, अल्पसंख्याक सेना संपर्कप्रमुख रियाज बागवान, उपशहरप्रमुख टिंकू देशपांडे, सुरेश माने, रविंद्र पाटील, प्रदीप मोहिते, धनाजी कारंडे, अशोक राबाडे, विकास शिरगांवे, सचिन पाटील, श्रीकांत मंडलिक आदी उपस्थित होते.


शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जोमाने कामाला लागा : राजेश क्षीरसागर