बातम्या

*महायुती विजय संकल्प उत्सव 2024: पेठवडगाव येथे दहीहंडी उत्सवाचे भव्य आयोजन*

dahihandi competition


By Administrator - 2/9/2024 5:46:36 PM
Share This News:



*महायुती विजय संकल्प उत्सव 2024: पेठवडगाव येथे दहीहंडी उत्सवाचे भव्य आयोजन*

हातकणंगले:पेठवडगाव येथे 3 सप्टेंबर 2024 रोजी, दलितमित्र डॉ. अशोकराव माने बापू प्रेमी पुरस्कृत महायुती विजय संकल्प उत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष दहीहंडी उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणून लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील व नामवंत कलाकार टीम मुंबई यांचा नृत्याविष्कार असेल. या कार्यक्रमाचे आयोजन हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महायुतीने केले असून, विजेत्या संघास रु. 1,25,525 चे बक्षीस देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. जि. प. सदस्य व भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते अशोकराव माने (बापू) यांची उपस्थिती असेल.

उत्सव नगरपालिका चौक, पेठवडगाव येथे सायंकाळी 5 वाजता सुरू होईल. महायुतीच्या आमदार म्हणून बापूंना एकजुटीने निवडण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी सर्वांना आमंत्रित करण्यात आले असून, अधिक माहितीसाठी 7276033636 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 


*महायुती विजय संकल्प उत्सव 2024: पेठवडगाव येथे दहीहंडी उत्सवाचे भव्य आयोजन*