राजकीय
लक्षवेधी आंदोलक संजय पाटील यांची शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश जोरदार इनकमिंग
By Administrator - 1/21/2024 5:08:28 PM
Share This News:
परिवर्तन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच जनसुराज्य शक्ती पक्ष माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश
लक्षवेधी आंदोलक संजय पाटील यांची शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश जोरदार इनकमिंग
"जय भवानी, जय शिवाजी", "शिवसेना जिंदाबाद",घोषणा देत जाहीर प्रवेश
कोल्हापूर दि.२० : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या मूलमंत्रानुसार शिवसेनेचे काम सुरु आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार, समाज कार्याचा वसा पुढे घेवून जाणारे शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात दिवसेंदिवस सामील होण्यास राज्यभरातील सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर सरसावत आहेत.
कोल्हापुरातही शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु असून, परिवर्तन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत आज जाहीर प्रवेश केला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते भगवा झेंडा आणि भगवा स्कार्फ स्वीकारून शेकडो युवकांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. यावेळी "जय भवानी, जय शिवाजी", "शिवसेना जिंदाबाद", "शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचा विजय असो" अशा घोषणा देण्यात आल्या.
श्री.संजय पाटील यांनी गेल्या बावीस वर्षात जनसामान्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, वंचितांच्या, शेतकऱ्यांच्या, रेशनच्या प्रश्नांवर ५०० हून अधिक आंदोलने केली आहेत. भ्रष्टाचार काळाबाजार या विरोधात टोकाची लढाई लढताना त्यांनी आजपर्यंत १३ शासकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यास भाग पाडले आहे. तसेच रेशनवरील भ्रष्टाचार उपटून काढताना आजपर्यंत अठरा रेशन धान्य दुकाने रद्द करायला लावले आहे.
२०१० मध्ये त्यांनी सलग अकरा आंदोलने करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त वाढावा मिळवून दिलेला आहे. त्यांनी जिल्हा परिषद मधील मुदतबाह्य औषध घोटाळा उघडकीस आणला तसेच रेशन वरील गहू घोटाळा उघडकीस आणला त्याचे पडसाद विधानसभेत उमटले राज्यभर हे घोटाळे गाजले होते. श्री.संजय पाटील तीन कामगार संघटनांचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असून राज्यभर त्यांचे पदाधिकारी संघटनेचे माध्यमातून कार्यरत आहेत.
पक्ष प्रवेशाच्या वेळी बोलताना श्री.संजय पाटील यांनी, राज्यात मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जनसामान्यांचे सरकार कार्यरत असून, कोल्हापूर जिल्ह्यात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी जनहिताच्या कामांचा धडाका लावला आहे. त्यांच्या कार्याची जनसामान्यांमधून प्रशंसा केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना जनसामान्यांच्या प्रश्नास खऱ्या अर्थाने न्याय देवू शकतो, हि भावना निर्माण झाली आहे. मी आणि माझ्या परिवर्तन संघटने सह इतर चार संघटना या पुढे शिवसेनेशी संलग्न म्हणून काम करणार असून, शेवटच्या श्वासापर्यंत खांद्यावरील भगवा खाली उतरणार नाही असे स्पष्ट केले.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अनेक मान्यवर सरसावत आहेत. गेल्या काही दिवसात शहरासह जिल्ह्यातील अनेक दिग्गजांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे. नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे करत असून, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्य विषयक, शैक्षणिक, स्वयंरोजगाराचे उपक्रम हाती घेवून समाजहिताच्या कामांना प्राधान्य द्यावे. चळवळीतील कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाल्याने पक्षाच्या कार्यास बळकटी मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शाहू मिल कामगार नेते अनिल कवाळे, उदय लोखंडे, गजानन हवालदार, युवा नेते सार्थक तोरस्कर, सुनील दावणे, पिंटू जाधव, नारायण कोकरे, संदीप वाडकर, साताप्पा कांबळे, तानाजी मोरे, अनिल जंगटे, अनिल कांबळे, सुशीला आडके, सावित्री सुतार, शेवंता गुरव, जयश्री मादर, मालन पाटील, उत्तम खांडेकर, अण्णाप्पा खेमलट्टी यांच्यासह महिला आणि युवा शेकडो संख्येने उपस्थित होते आदी उपस्थित होते.
लक्षवेधी आंदोलक संजय पाटील यांची शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश जोरदार इनकमिंग
|