राजकीय
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बी आर एस पक्ष ताकतीने लढणार.... संजय पाटील ,कोल्हापूर जिल्हा प्रभारी
By Administrator - 7/9/2023 1:26:39 PM
Share This News:
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बी आर एस पक्ष ताकतीने लढणार.... संजय पाटील ,कोल्हापूर जिल्हा प्रभारी
कोल्हापूर
राजारामपुरी येथे कोल्हापूर जिल्हा बी आर एस पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व समन्वयक व पदाधिकारी यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये पक्ष संघटना वाढीसाठी सभासद नोंदणी वाढवणे, पक्षांतर्गत असणारे नऊ सेल बळकट करणे ,पदाधिकाऱ्यांच्या निवडी करणे ,येऊ घातलेल्या निवडणुका बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हा प्रभारी संजय पाटील होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, बी आर एस पक्षाच्या जिल्ह्यातील समन्वयक यांनी आजपर्यंत 70 हजार सभासदांची नोंदणी केलेली आहे. तसेच महिना अखेरपर्यंत अजून 50 हजार नवीन सभासद नोंदणी करण्यात येणार आहे.
ग्राम पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत पक्षां अंतर्गत असणारे नऊ सेल बळकट करून पदाधिकाऱ्यांच्या निवडी पंधरा दिवसात करण्यात याव्या असेही त्यांनी मत व्यक्त केले यावेळी समन्वयक व सहसमन्वयक यांची नावे निश्चित करण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्यातील 86 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच होणार आहेत या निवडणुकांमध्ये बी आर एस पक्ष स्थानिक पातळीवर असणाऱ्या आघाड्या व समविचारी पक्ष यांना सोबत घेऊन ताकतीने मैदानात उतरणार आहे
जिल्ह्यात बी आर एस पक्षाचे खाते उघडणारच असा विश्वास यावेळी संजय पाटील यांनी व्यक्त केला
या बैठकीसाठी दिलीप चव्हाण,जिल्हा समन्वयक तोहिद बक्षु ,साकेत राज देशमुख ,विक्रम जरग, शरद कांबळे ,संग्राम जाधव, भीमराव पाटील , समीर दानवाडे, विनोद नाईक, तनवीर मुल्ला, शशिकांत आमने ,दिव्या मगदूम, श्रद्धा महागावकर ,सुनील नाईक, डॉ शिरगावे, विठ्ठल जाधव, अकबर सनदी, सौ दानवाडे ,मनीष महागावकर ,शिवाजी पाटील आदी उपस्थित होते
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बी आर एस पक्ष ताकतीने लढणार.... संजय पाटील ,कोल्हापूर जिल्हा प्रभारी
|