बातम्या
आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यानं बहीण भावाची आत्महत्या
By Administrator - 8/15/2024 3:00:07 PM
Share This News:
आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यानं बहीण भावाची आत्महत्या
कोल्हापूर : भूषण निळकंठ कुलकर्णी आणि भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी हे दोघेही उच्चशिक्षित होते. हे दोघेही अविवाहित असून त्यांची आई पद्मजा निळकंठ कुलकर्णी यांचं नुकतंच मे 2024 मध्ये निधन झालं होतं.
आज संभाजीनगर इथल्या नाळे कॉलनीत राहणाऱ्या भूषण निळकंठ कुलकर्णी आणि भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी या बहिण भावानं राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केलीय.आईच्या निधनानंतर हे दोघेही बहिण भाऊ नैराश्येत होते. हे दोघेही उच्चशिक्षित असून अविवाहित होते. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यानं आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलंय. या आत्महत्येची नोंद राजारामपुरी पोलिसांत करण्यात आलीय.
आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यानं बहीण भावाची आत्महत्या
|