बातम्या
श्री दत्त सहकारी दूध संस्थेचा ११०० लिटर संकलनाचा टप्पा पूर्ण
By nisha patil - 4/3/2025 5:17:48 PM
Share This News:
श्री दत्त सहकारी दूध संस्थेचा ११०० लिटर संकलनाचा टप्पा पूर्ण
आ. डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते सभासदांचा सत्कार
कोरेगाव (ता. वाळवा) येथील श्री दत्त सहकारी दूध संस्थेने प्रतिदिन ११०० लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण केला. यानिमित्ताने संस्थेच्या वतीने सभासदांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार डॉ. विनय कोरे (सावकार) यांनी सदिच्छा भेट देत सर्व संचालक व सभासदांचा विशेष सत्कार केला.
कार्यक्रमाला कोरेगावचे माजी सरपंच व वारणा दूध संघाचे माजी संचालक व्यंकटराव केशवराव पाटील (आबा), वारणा दूध संघाचे व्हा. चेअरमन एच. आर. जाधव (आण्णा), वारणा साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील, संदीप जाधव, संचालक लालासो पाटील, व्ही. टी. पाटील, अभिजीत पाटील, वारणा बँकेचे संचालक बाळासो बावडे, माजी संचालक संपतराव पाटील, सरपंच व संचालक मयूर पाटील (दादा), चेअरमन सुरेश पवार, व्हा. चेअरमन सुरेश भगवान पाटील, सचिव रमेश मोहिते यांच्यासह संचालक, सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आमदार डॉ. कोरे यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
श्री दत्त सहकारी दूध संस्थेचा ११०० लिटर संकलनाचा टप्पा पूर्ण
|