बातम्या
पोटाच्या तक्रारी, साफ करण्याचे १३ प्रभावी उपाय.....
By nisha patil - 5/27/2024 6:23:39 AM
Share This News:
*१) रोज जेवणानंतर दालचिनीची पावडर मधात मिसळून घ्या.
*२) १०० मि. लि. पाण्यात एक चमचा मेथी दाणे उकळून हे पाणी जेवणाआधी एक तास प्यावे व जेवणानंतर हे मेथीचे दाणे चाऊन खावे, याने सकाळी पोट साफ होते.
*३) भाजलेले जिरे पूड जेवणानंतर पाण्यासोबत घ्या.
*४) मनुका दुधात उकळून रात्री झोपण्यापूर्वी चावून खावे.
*५) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून गुलकंद खाऊन त्यावर एक कप भरून दूध घ्यावे.
*६) दूधात दोन तीन अंजिर उकळून मग अंजिर खावे आणि वरून दूध घ्यावे.
*७) एक ग्लास पाण्यात २ चमचे कोरफड गर मिसळून घ्यावे.
*८) रात्री झोपण्यापूर्वी एक कप पाण्यात एक ते दोन चमचे साजूक तुप व किंचित सैंधव मीठ घालून घ्यावे. याने सकाळी पोट साफ होईल.
*९) रोज सकाळी दोन खजुर साजुक तुपासोबत खाल्ल्यास पोट साफ होते.
*१०) ताजी कोरफड मंद गॅसवर भाजून, नंतर साल काढून, यातिल गर मलमलच्या कपड्यात गाळून, त्यात मध मिसळून घ्यावे. याने सकाळी पोट साफ होते.
*११) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून ओवा खावा, याने पोट साफ होते.
*१२) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून एरंडेल तेल घ्यावे, याने सकाळी पोट साफ होते.
*१३) त्रिफळा चूर्ण मातीच्या भांड्यात भिजवून मग सकाळी हे गाळून घ्यावे. याने पोट साफ होते.
पोटाच्या तक्रारी, साफ करण्याचे १३ प्रभावी उपाय.....
|