बातम्या
चारचाकी असलेल्या १४ हजार ३०२ बहिणींची होणार चौकशी.....
By nisha patil - 12/3/2025 6:06:37 PM
Share This News:
चारचाकी असलेल्या १४ हजार ३०२ बहिणींची होणार चौकशी.....
घरोघरी जाऊन अंगणवाडीसेविका करणार पडताळणी : शासनाकडुन आली य़ादी...
लाडकी बहिणीच्या निकषात बसत नसतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या जिल्ह्यातील १४ हजार ३०२ महिलांचे अर्ज शासनाने जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे तपासणीसाठी पाठवलेत. ही यादी घरात चारचाकी असलेल्या महिलांची असून, त्या-त्या तालुक्यांमधील अंगणवाडीसेविका व आरटीओ कार्यालयाला पाठविण्यात आलीय. लाडकी बहीण योजनेच्या महिलांच्या अर्जाची तपासणी सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात चारचाकी वाहन असलेल्यांची नावे यादीतून काढली जाणार आहेत. तालुक्यांच्या ठिकाणी अंगणवाडीसेविका यादीनुसार लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन चारचाकी वाहन आहे की नाही, याची खातरजमा करतील. आरटीओकडूनदेखील कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानुसार लाभार्थी महिलांची नावे योजनेतून काढली जातील.
चारचाकी असलेल्या १४ हजार ३०२ बहिणींची होणार चौकशी.....
|