बातम्या

कर्जाची एकरक्कमी परतफेड करणाऱ्या लाभार्थींच्या व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत

50 percent discount in interest amount for beneficiaries who repay the loan in lump sum

By nisha patil - 2/13/2025 10:23:12 PM
Share This News:

कर्जाची एकरक्कमी परतफेड करणाऱ्या लाभार्थींच्या व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत

कोल्हापूर, : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या (ओबीसी महामंडळ) थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरक्कमी भरणा करणा-या लाभार्थीस थकीत व्याजात 50 टक्के सवलत (सुट) देण्याबाबतची एकरक्कमी योजना दि. 31 मार्च 2025 पर्यंत लागू करण्यात येत आहे.

त्यानुसार थकबाकीदार लाभार्थीनी या योजनेचा फायदा घेवून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पी.एन. दळवी यांनी केले आहे.

कर्जाची एकरक्कमी परतफेड करणाऱ्या लाभार्थींच्या व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत
Total Views: 44