बातम्या
साने गुरुजी कथामालेचे ५७ वे अधिवेशन कोल्हापुरात
By nisha patil - 3/19/2025 10:03:12 PM
Share This News:
साने गुरुजी कथामालेचे ५७ वे अधिवेशन कोल्हापुरात
विचारवंतांचा मोठा सहभाग राहणार..
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई आणि कोल्हापूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने ५७ वे राज्य अधिवेशन २२ व २३ मार्च रोजी मुस्लिम बोर्डिंग हॉल, दसरा चौक येथे होणार आहे.
अधिवेशनाचे उद्घाटन खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते होणार असून, राज्यभरातून ५० हून अधिक विचारवंत आणि ७०० सानेगुरुजीप्रेमी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात विविध मान्यवरांचा सहभाग राहणार असून नियोजनाची माहिती एम. एस. पाटोळे आणि हसन देसाई यांनी दिली.
साने गुरुजी कथामालेचे ५७ वे अधिवेशन कोल्हापुरात
|