बातम्या
पणजी येथे 61 वी डाक अदालत
By nisha patil - 10/3/2025 7:59:53 PM
Share This News:
पणजी येथे 61 वी डाक अदालत
कोल्हापूर, पोस्ट मास्तर जनरल, गोवा रिजन पणजी व्दारे 20 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या कार्यालयामध्ये 61 व्या डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या अदालतीत गोवा रिजनशी संबंधित पोस्ट सेवेमधील तक्रारी, ज्या सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाल्या नाहीत किंवा समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, त्यांचा विचार केला जाईल. विशेषतः टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारींचा तपशीलवार उल्लेख आवश्यक आहे (उदा. तक्रारी पाठविलेल्या तारखेचा उल्लेख, संबंधित अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ.).
संबंधितांनी आपली तक्रार सहायक निदेशक डाक सेवा-1, पोस्टमास्तर जनरल यांच्या कार्यालय, गोवा रिजन पणजी (पिन: 403001) कडे दोन प्रतींसह दि. 12 मार्च 2025 पर्यंत अथवा तत्पूर्वी पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.
पणजी येथे 61 वी डाक अदालत
|