विशेष बातम्या
शहीद दिनानिमित्त 94 किमी सायकल परिक्रमा
By nisha patil - 3/25/2025 7:52:03 PM
Share This News:
शहीद दिनानिमित्त 94 किमी सायकल परिक्रमा
देशातील शांततेसाठी सायकलपटूंची अनोखी श्रद्धांजली
सायकल प्रवासातून सामाजिक संदेश
94 व्या शहीद दिनानिमित्त कोल्हापूरच्या ध्येयवेड्या सायकलपटूंनी 94 किमी सायकल परिक्रमा करून शहीदांना विनम्र अभिवादन केले. राम कारंडे, पांडुरंग माळी आणि निलेश बगली यांनी सांगली ते कोल्हापूर हा प्रवास करून देशात शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली.
सकाळी 5.30 वाजता सांगलीतून निघालेल्या या तिघांनी मिरजमार्गे कोल्हापूर गाठले. देशात छत्रपती आणि महामानवांचा होणारा अपमान, महिलांवरील अत्याचार, डॉक्टर आणि पोलिसांवरील हल्ले याविरोधात जनजागृती करण्याचा संदेश देत त्यांनी हा प्रवास पूर्ण केला.
शहीद दिनानिमित्त 94 किमी सायकल परिक्रमा
|