बातम्या
इचलकरंजीतील पाणीपुरवठा प्रकल्पांच्या कामाचा आ.राहुल आवाडेंनी घेतला आढावा
By nisha patil - 2/28/2025 5:23:04 PM
Share This News:
इचलकरंजीतील पाणीपुरवठा प्रकल्पांच्या कामाचा आ.राहुल आवाडेंनी घेतला आढावा
इचलकरंजी महानगरपालिकेला आ.राहुल आवाडेंनी भेट देऊन आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासोबत शहरातील विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. या भेटीवेळी माजी मंत्री आणि आ. प्रकाशआण्णा आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या शुद्ध पेयजल प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच, अद्याप बंद असलेल्या प्रकल्पांचे कारण विचारत, ते त्वरित सुरू करण्याच्या सूचना आ.राहुल आवाडेंनी दिल्या.
याशिवाय आ.राहुल आवाडेंच्या स्वखर्चातून मारलेल्या बोरवेल्सना लवकरात लवकर महानगरपालिकेचे कनेक्शन मिळावे, यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी सुरू असलेल्या कृष्णा पाईपलाइन प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीस MGP चे काटकर, सुभाष देशपांडे, बाजीराव कांबळे, विजय पाटील आणि अभय शिरोलीकर उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
इचलकरंजीतील पाणीपुरवठा प्रकल्पांच्या कामाचा आ.राहुल आवाडेंनी घेतला आढावा
|