बातम्या

देशाची अर्थव्यवस्था गतीमान करणारा अर्थसंकल्प – खासदार धनंजय महाडिक

A budget that accelerates the economy of the country


By nisha patil - 2/13/2025 10:24:43 PM
Share This News:



देशाची अर्थव्यवस्था गतीमान करणारा अर्थसंकल्प – खासदार धनंजय महाडिक

राज्यसभेत बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचं जोरदार समर्थन केलं. त्यांनी सांगितलं की, हा अर्थसंकल्प देशातील १४४ कोटी लोकांची आर्थिक ताकद वाढवणारा आणि मध्यमवर्गीय जनतेला दिलासा देणारा आहे. यामुळे २०२७ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचण्यास चालना मिळेल.

महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आर्थिक धोरणांचं कौतुक करताना सांगितलं की, कोविडनंतर अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली, मात्र भारताने वेगवान प्रगती केली. यंदाच्या अर्थसंकल्पात महसुलात १ लाख कोटी रुपयांची सुट जाहीर करण्यात आली असून त्याचा शंभर कोटी भारतीयांना फायदा होईल.

महाडिक यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय जनतेला सर्वाधिक लाभ झाला असल्याचं स्पष्ट केलं. केंद्र सरकारच्या विविध योजना, आत्मनिर्भर भारत संकल्पना, रोजगार निर्मिती, शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी असलेल्या योजनांमुळे देशाच्या विकासाला वेग मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


देशाची अर्थव्यवस्था गतीमान करणारा अर्थसंकल्प – खासदार धनंजय महाडिक
Total Views: 38