बातम्या
घिसाड गल्ली परिसरात घरांना भीषण आग.
By nisha patil - 3/14/2025 3:59:29 PM
Share This News:
घिसाड गल्ली परिसरात घरांना भीषण आग.
भाडेकरूंचे लाखो रुपयांचे नुकसान
कोल्हापुरातील घिसाड गल्ली परिसरातील घराला आज पहाटे साडे तीनच्या दरम्यान भीषण आग लागली.यामध्ये सुमारे साठ लाखांचे नुकसान झालय. संजय मुग यांच्या घराला ही आग लागली. घरात राहणाऱ्या पाच भाडेकरू कुटुंबाचे प्रापंचिक साहित्य आगीमध्ये जळून खाक झालय.
दरम्यान एका भाडेकरूच्या घरामध्ये फटाक्याचे गोडाऊन असल्यामुळे लागलेली आग जोरात पसरली. आग लागल्याची वर्दी घर मालक संजय मुग यांनी अग्निशामक विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. सकाळी सहा वाजेपर्यंत आग आटोक्यात आणता आली. दरम्यान आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही.
घिसाड गल्ली परिसरात घरांना भीषण आग.
|