बातम्या
हुपरीत आधुनिक आरोग्यसेवेसाठी नवे पाऊल ..
By nisha patil - 3/18/2025 5:45:54 PM
Share This News:
हुपरीत आधुनिक आरोग्यसेवेसाठी नवे पाऊल ..
आशा धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते...
आ. डॉ. सुजित मिणचेकर व डॉ. अभिजित कोगनोळे यांच्या हस्ते लोकार्पण
हुपरी (ता. हातकणंगले) येथे आशा धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन आमदार डॉ. सुजित मिणचेकर (संचालक, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर) आणि डॉ. अभिजित कोगनोळे यांच्या हस्ते संपन्न झाले. या हॉस्पिटलच्या माध्यमातून हुपरी व परिसरातील नागरिकांना आधुनिक आणि परिपूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यावेळी आमदार मिणचेकर यांनी डॉ. जंगले व त्यांच्या टीमचे अभिनंदन करत, त्यांच्या आरोग्यसेवेच्या योगदानाबद्दल कौतुक केले. या उद्घाटन सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील, सरपंच संगीता नरंदे, माजी नगरसेविका लक्ष्मी साळुंखे, युवा सेना शहराध्यक्ष अजित उगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हुपरीत आधुनिक आरोग्यसेवेसाठी नवे पाऊल ..
|