बातम्या

वनस्पतीजन्य आहार हृदयास लाभदायी...

A plant based diet is good for the heart


By nisha patil - 6/13/2024 5:49:30 AM
Share This News:



  वनस्पती व फळे यासारख्या अन्नात सल्फर अमायनो आम्ले कमी असल्याने त्यांचा संबंध हृदयविकाराची जोखीम कमी होण्याशी असतो, असे मत एका संशोधनात दिसून आले आहे. अमायनो आम्ले हे प्रथिनांचे पायाभूत घटक असतात. यातील सल्फर अमायनो आम्ले ही त्याचा एक उपघटक असतात. त्यात मेथिओनिन, सिस्टीन यांचा समावेश होतो, ती आम्ले चयापचय व आरोग्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. पेनसिल्वानिया स्टेट युनिव्हर्सिटीचे जॉन रिची यांच्या मते गेली अनेक वर्षे सल्फर अमायनो आम्ले ही दीर्घायुष्यासाठी हानिकारक मानली जात होती. त्याचे कारण म्हणजे माणसाने जर सल्फर अमायनो आम्ल असलेले अन्नघटक जास्त प्रमाणात घेतले तर आजार वाढण्याची जास्त शक्यता असते. आहार आणि रक्तातील जैवखुणा यांचा अभ्यास ११००० लोकांच्या संदर्भात करण्यात आला, त्यात असे दिसून आले की, जे लोक सल्फर अमायनो आम्ले कमी प्रमाणात असलेले पदार्थ सेवन करीत होते.
त्यांच्यात हृदयाशी संबंधित रोग कमी दिसून आले. कार्डिओमेटॅबोलिक डिसीज हा हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता यात कमी झाली.   
                   

 रक्तातील जैवखुणा या कोलेस्टोरेलच्या वाढत्या प्रमाणासारखेच हृदयविकाराचे पूर्वसंकेत देत असतात. जास्त प्रमाणात सल्फर अमायनों आम्ले असलेले अन्न सेवन केल्यास ते धोकादायक असते. अन्नधान्ये, फळे व भाज्या वगळता अनेक अन्नपदार्थात सल्फर अमायनो आम्लांचे प्रमाण जास्त असते.


वनस्पतीजन्य आहार हृदयास लाभदायी...