बातम्या

ए एस ट्रेडर्सच्या डायरेक्टरची आलिशान Jaguar कार जप्त.

A s tendres crem news


By nisha patil - 4/4/2025 2:44:05 PM
Share This News:



ए एस ट्रेडर्सच्या डायरेक्टरची आलिशान Jaguar कार जप्त.

पुण्यातील मुंढवा परिसरातून कार घेतली ताब्यात.

ए.एस.ट्रेडर्सच्या संचालकांनी जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केलीय.या प्रकरणी ए.एस.ट्रेडर्स कंपनीचा डायरेक्टर खुपिरे इथल्या विजय ज्योतिराम पाटील यांच्या नावे असलेली आलिशान जॅग्वार कार पोलिसांनी जप्त केलीय.

MH -09-FZ- 4654 या क्रमांकाची ही आलिशान कार पुण्यातील मुंढवा इथल्या सिल्व्हर गुडस कंडोनियम सोसायटीमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.यानुसार तपास पथकातील पोलिस अंमलदार विजय काळे,राजू येडगे,राजेंद्र वरंडेकर यांनी पुण्यातून ही कार जप्त करून कोल्हापूरमध्ये आणली.        

या गुन्हयाचा तपास पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली ,आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या पर्यवेक्षणाखाली तपास अधिकारी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर आणि त्यांचे तपास पथक करीत आहे.


ए एस ट्रेडर्सच्या डायरेक्टरची आलिशान Jaguar कार जप्त.
Total Views: 16