बातम्या

शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढावेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

A statement to the District Collector to settle the problems of the farmers


By nisha patil - 1/16/2025 3:03:14 PM
Share This News:



शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढावेत, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर, दि. 16: पन्हाळा प्रतिनिधी , शहाबाज मुजावर, शिवपानंद शेत रस्ते चळवळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्हा चळवळ कृती समितीने कोल्हापूर महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी स्वप्निल पोवार यांना निवेदन दिले. शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी निवेदनात काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या. त्यात शेतरस्त्यांचे सर्वेक्षण, शेतरस्त्यांवरील नंबरी हलवणाऱ्यांवर दंड, तसेच प्रलंबित शेतरस्ता केसेस तातडीने निकाली काढण्याची मागणी केली आहे.

याव्यतिरिक्त, शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आणि शेतजमीन भुधारकास नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. उपजिल्हाधिकारी पोवार यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना लवकरच रस्ते विषयक परिपत्रक आदेश पारित करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा कृती समितीचे सदस्य आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढावेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
Total Views: 34