बातम्या
संतोष देशमुखच्या मुलाला आमिर खानची कडाडून मिठी...
By nisha patil - 3/24/2025 5:01:34 PM
Share This News:
संतोष देशमुखच्या मुलाला आमिर खानची कडाडून मिठी...
आमिर खानची संवेदनशील भेट...
संतोष देशमुखांच्या कुटुंबाला दिला भावनिक आधार
राज्यभरात गाजत असलेल्या संतोष देशमुख प्रकरणानंतर आता या घटनेने एक वेगळे वळण घेतले आहे. प्रसिद्ध अभिनेता आमिर खानने पुण्यात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख आणि त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आमिरने या कुटुंबाच्या दु:खात सहभागी होत त्यांना भावनिक आधार दिला.
बालेवाडी स्टेडियम येथे ‘पाणी फाउंडेशन’च्या कार्यक्रमादरम्यान आमिर खानने देशमुख कुटुंबाशी संवाद साधला. धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम आमिरसमोर मांडला. या हृदयविदारक कहाणीने आमिर अस्वस्थ झाला. तो त्यांचे बोल ऐकत राहिला आणि न बोलता मनाने हे दु:ख सामावून घेत राहिला.संतोष देशमुखांचा नंतरचा संघर्ष पाहणाऱ्या विराजला आमिरने कडाडून मिठी मारली. त्याच्या डोळ्यातील वेदना पाहून आमिर भारावून गेला. त्या एका मिठीतून त्याने विराजला धीर दिला, एक हळवा आधार दिला. हा क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, अनेकांनी आमिरच्या या संवेदनशीलतेचे कौतुक केले आहे.
संतोष देशमुखच्या मुलाला आमिर खानची कडाडून मिठी...
|