बातम्या
अचिव्हर्स इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने क्रीडा पेरेंट्स मॅनेजमेंट प्रोग्राम संपन्न...
By nisha patil - 3/17/2025 4:47:21 PM
Share This News:
अचिव्हर्स इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने क्रीडा पेरेंट्स मॅनेजमेंट प्रोग्राम संपन्न...
रुकडीमध्ये ‘क्रीडा पेरेंट्स मॅनेजमेंट प्रोग्राम’ उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम – पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मनीषा शिक्षण प्रसारक मंडळ अतिग्रे संचलित अचिव्हर्स इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने क्रीडा पेरेंट्स मॅनेजमेंट प्रोग्राम हा नाविन्यपूर्ण उपक्रम सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात रुकडी येथे पार पडला. ग्रामपंचायत चौकामध्ये मोठ्या संख्येने नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या साक्षीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी शिक्षणात उत्तुंग यश मिळवावे, शैक्षणिक बुद्धिमत्ता वाढवावी, तसेच त्यांचा सर्वांगीण विकास कसा व्हावा यावर या उपक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित शिक्षकांच्या कष्टाचे आणि संस्थेच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे नागरिकांनी विशेष कौतुक केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सनथ कुमार खोत, माजी उपसरपंच शितल खोत, उपसरपंच मालती इंगळे, दिलीप इंगळे, संजय आंभी, भरत कुंभार, मुल्ला सर, सुनील भारमल, प्रा. डॉ. भोसले, भाऊसाहेब आंभी आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक, मुख्याध्यापक सचिन आंभी, संचालक मंडळ, शिक्षकवृंद तसेच नागरिक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
शिक्षणाच्या आधुनिक दृष्टिकोनातून अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास उपयुक्त ठरतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
अचिव्हर्स इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने क्रीडा पेरेंट्स मॅनेजमेंट प्रोग्राम संपन्न...
|