बातम्या
अभिनेता आमिर खानने गौरी सोबतच ते अफेअर मान्य केलं
By nisha patil - 3/14/2025 4:03:40 PM
Share This News:
अभिनेता आमिर खानने गौरी सोबतच ते अफेअर मान्य केलं
आमिर खानच्या जीवनात आता गौरीची एन्ट्री...
अभिनेता आमिर खान तिसरे लग्न करणार
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या 60व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्याने आपली लव्ह लाइफ जगासमोर उघड केली. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये त्याने गर्लफ्रेंड गौरीला पॅपराजींशी भेट घालून दिली. मात्र, तिच्या प्रायव्हसीचा सन्मान ठेवत फोटो शेअर न करण्याची विनंती केली.
गौरी ही बॉलिवूडशी संबंधित नाही आणि ती बंगळुरूमधील रहिवासी आहे. दोघे गेल्या 2-3 वर्षांपासून एकत्र आहेत. विशेष म्हणजे, गौरीला 6 वर्षांचा मुलगाही आहे. आता आमिर लवकरच तिसऱ्या लग्नाच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
अभिनेता आमिर खानने गौरी सोबतच ते अफेअर मान्य केलं
|