बातम्या
अभिनेता सागर कारंडे यांची ६१.८३ लाखांची फसवणूक!
By nisha patil - 4/4/2025 2:51:26 PM
Share This News:
अभिनेता सागर कारंडे यांची ६१.८३ लाखांची फसवणूक!
प्रसिद्ध अभिनेता आणि लेखक सागर कारंडे यांची तब्बल ६१.८३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियावर "इन्स्टाग्रामवरील पोस्टला लाईक करून दीडशे रुपये मिळवा" असे आमिष दाखवण्यात आले आणि त्याद्वारे त्यांना या फसवणुकीच्या जाळ्यात ओढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर कारंडे यांनी या ऑफरला प्रतिसाद दिल्यानंतर त्यांना आणखी गुंतवणुकीचे प्रलोभन देण्यात आले. वेगवेगळ्या टप्प्यांवर अधिक पैसे मिळविण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून ६१.८३ लाख रुपये उकळण्यात आले. आपल्या फसवणुकीची जाणीव होताच त्यांनी तातडीने सायबर पोलिस ठाणे (उत्तर विभाग) येथे तक्रार दाखल केली.
सध्या सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अभिनेता सागर कारंडे यांची ६१.८३ लाखांची फसवणूक!
|