बातम्या
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी सर्वपक्षीय आंदोलन...
By nisha patil - 3/25/2025 1:28:27 PM
Share This News:
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी सर्वपक्षीय आंदोलन...
आमदार राजेश क्षीरसागर आणि महेश जाधव यांचा पुढाकार
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या मागणीसाठी सर्वपक्षीय हद्दवाढ समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले. भाजप नेते महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. हद्दवाढीच्या मागणीसाठी विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र येत शासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
या आंदोलनास कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी भेट देऊन स्वतः सक्रिय सहभाग घेतला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ गरजेची असून, यासाठी आपला पाठिंबा कायम राहील, असे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
यावेळी सर्वपक्षीय हद्दवाढ समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी सर्वपक्षीय आंदोलन...
|