बातम्या

इचलकरंजीतील एनएसएस विभागाला अमल महाडिकांची भेट...

Amal Mahadikas visit to NSS department in Ichalkaranji


By nisha patil - 1/27/2025 1:54:56 PM
Share This News:



इचलकरंजीतील एनएसएस विभागाला अमल महाडिकांची भेट...

पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम घेतला हाती.....

 हातकणंगलेतील मालेवाडी येथे माले ग्रामपंचायतीच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लोकसहभागातून पाणी अडवा पाणी जिरवा हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. इचलकरंजीच्या एनएसएस विभागाच्या विद्यार्थ्यांनी पाझर तलाव परिसरात सुरू केलेल्या कामाला आ.अमल महाडिकांनी भेट दिलीय.
 
हातकणंगलेतील मालेवाडी येथे माले ग्रामपंचायतीच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लोकसहभागातून पाणी अडवा पाणी जिरवा हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. ग्रामस्थांसोबत दत्ताजीराव कदम आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज इचलकरंजीच्या एनएसएस विभागाच्या विद्यार्थ्यांनी पाझर तलाव परिसरात सुरू केलेल्या कामाला आ.अमल महाडिकांनी भेट दिलीय. यावेळी अमल महाडिक बोलताना म्हणाले, ग्रामस्थांनी एकजुटीने जलसाठा वाढवण्यासाठी चालवलेले प्रयत्न नक्कीच अनुकरणीय आहेत. यावेळी सरपंच राहुल कुंभार,उपसरपंच बंटी पाटील, विकास संस्थेचे अध्यक्ष अभयसिंह पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उमेश पाटील, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य संतोष खोत, अमोल पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


इचलकरंजीतील एनएसएस विभागाला अमल महाडिकांची भेट...
Total Views: 46