बातम्या

 समाज परिवर्तनासाठी समर्पित संघर्षशील कार्यकर्ता  - अनिता गवळी 

Anita Gawli


By nisha patil - 12/3/2025 6:18:19 PM
Share This News:



 समाज परिवर्तनासाठी समर्पित संघर्षशील कार्यकर्ता  - अनिता गवळी 

कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्या आणि सामाजिक चळवळीमध्ये आपले संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या अनिता गवळी या नाव आज समाजसेवा, विचार प्रसार आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी प्रसिद्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या विचारांना कृतीत उतरवण्यासाठी अनिता गवळी यांनी महाराष्ट्रासह कर्नाटकातील विविध गावांमध्ये विचारप्रसाराचे कार्य अविरतपणे केले आहे.

शिक्षण ही वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो डरकाळी फोडेल, या बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज उन्नतीसाठी झटण्याचे काम केले. अनेक गावांमध्ये महिलांसाठी प्रबोधन शिबिरे, विचारगोष्टी आणि समाजजागृती कार्यक्रमांचे आयोजन करत त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला.

विशेष म्हणजे, महिला बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे महत्त्वाचे कार्य अनिता गवळी यांनी केले आहे. ग्रामीण भागातील महिलांना एकत्र आणून त्यांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने प्रवृत्त केले. महिलांच्या उद्योगांना चालना देण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन त्यांना प्रशिक्षण, मदत आणि प्रेरणा दिली.


 समाज परिवर्तनासाठी समर्पित संघर्षशील कार्यकर्ता  - अनिता गवळी 
Total Views: 39