बातम्या
विवेकानंदच्या अंकुश हाक्के याचे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मॅरेथॉन स्पर्धेतील यश
By nisha patil - 3/1/2025 1:01:10 PM
Share This News:
विवेकानंदच्या अंकुश हाक्के याचे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मॅरेथॉन स्पर्धेतील यश.
कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स विद्यापीठ भुवनेश्वर येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ हाप मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर चा बी.ए. भाग 3 मध्ये शिकत असणारा अंकुश लक्ष्मण हाक्के याने तब्बल १ तास ६. मिनिट 29 सेकंद वेळ देत स्पर्धा पूर्ण करत तृतीय क्रमांक पटकावला. त्यामुळे तो जर्मनी येथे होणाऱ्या जागतिक आंतर विद्यापीठ हाप मॅरेथॉन स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी पात्र ठरला आहे.
या खेळाडूला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे संस्थेच्या सचिव प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. श्री. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांचे प्रोत्साहन लाभले. याप्रसंगी त्यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सदर खेळाडूस जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार आर. बी.जोग व श्री सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
विवेकानंदच्या अंकुश हाक्के याचे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मॅरेथॉन स्पर्धेतील यश
|