व्यवसाय

अँटिलिया स्फोटक प्रकरण: प्रदीप शर्मा यांना न्यायालयाचा दणका

Antilia blast case


By nisha patil - 2/15/2025 7:51:11 PM
Share This News:



अँटिलिया स्फोटक प्रकरण: प्रदीप शर्मा यांना न्यायालयाचा दणका

मुंबई, १५ फेब्रुवारी २०२५ – माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अँटिलिया स्फोटक प्रकरणात दोषमुक्त करण्यास विशेष एनआयए कोर्टाने नकार दिला आहे. न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी त्यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला.

फेब्रुवारी २०२१ मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या २० कांड्या आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. त्यानंतर काही दिवसांतच गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीमध्ये सापडला. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत.

२०१९ मध्ये शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवलेल्या शर्मा यांना २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, आता मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा नाकारत मोठा निर्णय घेतला आहे.


अँटिलिया स्फोटक प्रकरण: प्रदीप शर्मा यांना न्यायालयाचा दणका
Total Views: 22