बातम्या

संधिवात:-

Arthritis


By nisha patil - 6/21/2024 12:29:54 AM
Share This News:



संधिवाताला सांधेदुखी असेही म्हणतात. सांध्यांमध्ये कार्टिलेज नावाचा घटक असतो. या कार्टिलेजमुळे सांध्यांची हालचाल योग्यरीत्या होत असते. कोणत्याही कारणास्तव कार्टिलेजची झीज झाली असता सांधेदुखी वाढते व या वेदना असह्य होतात. सांध्यांमधील हाडे एकमेकांना घासली जातात त्यामुळे गुडघ्यामध्ये सूज येऊ लागते. या स्थितीला सांधेदुखी किंवा ऑस्टिओआर्थरायटिस असे म्हटले जाते.

 सांधेदुखी ची करणे:- 
साधारणतः साठ वर्षानंतर हा त्रास वाढता असल्याचे दिसून येतो.
वाढलेल्या वजनाचा अतिरिक्त भार हा गुडघ्यावर, खुब्याच्या सांध्यावर पडत असतो.
- व्यायामाचा अभाव असल्यास कार्टिलेजची क्षमता कमी होते.
- हाडाचे फ्रॅक्चर असल्यास हा त्रास वाढतो.
- दोन सांध्यांमध्ये गॅप असल्यास ही स्थिती निर्माण होते. 
- शरिरातील संप्रेरकातील (हार्मोनल) बदल, रजोनिवृत्ती यामुळे कॅल्शियमची कमतरता निर्माण होत असल्याने पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस होण्याची शक्यता अधिक असते.

 संधिवाताचा त्रास होऊ नये म्हणून काय करावे? 
- संतुलित आहार घ्यावा
- लठ्ठपणामुळे गुडघ्यासारख्या सांध्यावर अधिक ताण येतो. यासाठी वजन आटोक्यात ठेवणे
- नियमित व्यायाम, योगासने करावीत, चालणे, सायकलिंग, पोहणे असे व्यायाम करावेत.
- हाडांची झीज होत असल्यास कॅल्शियमचे हाडांपर्यंत शोषण होण्यासाठी ड जीवनसत्त्वाची गरज असते. त्यासाठी सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यावे.


संधिवात:-