बातम्या
अटल महाआरोग्य शिबिराचा तब्बल १,२१,५२३ जणांनी घेतला लाभ
By nisha patil - 3/3/2025 2:39:13 PM
Share This News:
अटल महाआरोग्य शिबिराचा तब्बल १,२१,५२३ जणांनी घेतला लाभ
मुलींना गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक लस मोफत देण्याचा निर्णय लवकरच...
लोकनेते लक्ष्मणभाऊ जगतापांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अटल चॅरिटेबल फौंडेशन आयोजित अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. नवी सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर झालेल्या या शिबिरात एकूण १,२१,५२३ नागरिक सहभागी झाले. शिबिराच्या पहिल्या दिवशी काल ४८,७६३ नागरिकांनी लाभ घेतला होता. शिबिरात महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधव सहभागी झाले.
राज्यातील सर्व मुलींना शासनातर्फे गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी घोषणा यावेळी ना. प्रकाश आबिटकरांनी केली. राज्याचे अर्थमंत्री लवकरच त्यासाठी आवश्यक तरतूद करून घोषणा करतील, असेही ना.प्रकाश आबिटकरांनी सांगितले.
अटल महाआरोग्य शिबिरास आ. उमाताई खापरे, , माजी महापौर माई ढोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संपर्क प्रमुख मिलिंद देशपांडे, कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, तसेच भाजपा पिंपरी चिंचवड शहराचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
अटल महाआरोग्य शिबिराचा तब्बल १,२१,५२३ जणांनी घेतला लाभ
|