बातम्या
रुई-चंदूर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण...
By nisha patil - 2/27/2025 2:50:24 PM
Share This News:
रुई-चंदूर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण...
ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा
मंत्री प्रकाशअण्णा आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांच्या विशेष फंडातून तसेच जवाहर शेतकरी साखर कारखान्याचे संचालक व माजी सरपंच अभयकुमार काश्मिरे यांच्या प्रयत्नातून ५ कोटी रुपये खर्चून रुई ते चंदूर मळी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे.
या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ता आणि अपघातांचे प्रमाण वाढले होते. मात्र, या नवीन डांबरीकरणामुळे आता प्रवास सुलभ व सुरक्षित झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या कामासाठी मा. मंत्री प्रकाशअण्णा आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिला, तर अभयकुमार काश्मिरे यांनी प्रशासनाशी पाठपुरावा करून काम लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले.
रुई-चंदूर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण...
|