बातम्या

राष्ट्रीय जनऔषधी दिनानिमित्त पुण्यात जनजागृती मोहिम

Awareness campaign in Pune on the occasion of National Janaushadhi Day


By nisha patil - 7/3/2025 10:48:33 PM
Share This News:



राष्ट्रीय जनऔषधी दिनानिमित्त पुण्यात जनजागृती मोहिम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ मार्च हा राष्ट्रीय जनऔषधी दिन म्हणून घोषित केला असून, किफायतशीर आणि गुणवत्तापूर्ण जेनेरिक औषधांचा प्रसार करण्यासाठी १ ते ७ मार्च दरम्यान जनऔषधी सप्ताह साजरा करण्यात आला. पुणे जिल्ह्याची जबाबदारी असलेले खासदार धनंजय महाडिक यांनी यानिमित्त पुण्यात जनऔषधी केंद्रांना भेटी देऊन रुग्णांशी संवाद साधला आणि जनजागृती मोहिम राबवली.

देशभरात १५,००० हून अधिक जनऔषधी दुकाने कार्यरत असून, केंद्र सरकारने पुढील दोन वर्षांत २५,००० दुकाने सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या औषधांचे दर नामांकित ब्रँडच्या तुलनेत ५० ते ९० टक्के कमी असल्याने नागरिकांची मोठी आर्थिक बचत होत आहे. जनऔषधी सुगम मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना जवळील केंद्र व औषधांची माहिती मिळू शकते.

खासदार महाडिक यांनी पुण्यातील नागरी संस्था व संघटनांशी संवाद साधत या उपक्रमाचा प्रचार केला. यावेळी राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


राष्ट्रीय जनऔषधी दिनानिमित्त पुण्यात जनजागृती मोहिम
Total Views: 26