बातम्या
आयुर्वेदात एक उपचार उपलब्ध आहे जो अगदी प्राचीन काळापासून
By nisha patil - 4/13/2024 9:26:00 AM
Share This News:
हा उपाय म्हणजे लसूण घातलेले दूध.पण लसूण हे वेदनाशामक आणि जन्तुरोधक असल्याचं तुम्हाला माहितीच असेल. त्याचबरोबर लसूण रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीराची वेदना सहन करण्याची शक्ती वाढवते. दूध सुद्धा आरोग्यदायी समजलं जातं.
म्हणूनच दुधामध्ये लसूण घेणे हा सायटिकावरील तत्काळ आणि अत्यंत सोपा उपाय आहे.चार लसणाच्या पाकळ्या
२०० मिली दूध आणि
मध
लसणाच्या पाकळ्या आधी व्यवस्थित बारीक करून त्याची पेस्ट करावी. त्यानंतर दूध तापायला ठेवून त्यात ही पेस्ट घालावी. दूध मध्यम आचेवर उकळेपर्यंत तापवावे. नंतर ते गोड व्हावे म्हणून त्यात मध घालावा.
चांगल्या परिणामांसाठी हे दूध रोज २०० मिली प्यावे.आतड्यात होणाऱ्या जंतूंचा नायनाट करण्यासाठी सलग दहा दिवस रिकाम्या पोटी हे दूध प्यायलास आतडे निरोगी होतात.
कोरडा कफ असल्यास रात्री असे दूध घेतल्याने तो कमी होतो.
दम, श्वसनाचे विकार, फुफ्फुसाचे विकार यांवर सुद्धा हे दुध उपयुक्त ठरते.वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे लसणाचे दुध मदत करते.बद्धकोष्ठता, मलावरोध व पचनाच्या समस्या दूर करण्यासाठीही याचा उपयोग होतो.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली प्रतिकार शक्ती वाढवून कुठल्याही प्रकारच्या संसर्गास बळी पडण्यापासून दूर ठेवते.
अत्यंत साधा असणारा हा घरगुती उपाय असा विविध प्रकारे आपल्याला मदत करतो.
आरोग्य खूप बिघडल्यानंतर मोठमोठे उपचार करण्यापेक्षा हा उपाय सोप्पाच म्हणता येईल. तुम्हाला सायटिका असो वा नसो पण हे लसूण घातलेले दुध नक्की प्या आणि सुदृढ राहा.
आयुर्वेदात एक उपचार उपलब्ध आहे जो अगदी प्राचीन काळापासून
|