बातम्या
लिंबूचे आयुर्वेदिक फायदे
By nisha patil - 8/29/2024 10:24:53 AM
Share This News:
▪️ लिंबू हा व्हिटॅमिन C चा उत्तम स्त्रोत आहे
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण खूप जास्त असते. व्हिटॅमिन सी हे आपल्या शरिरासाठी प्राथमिक अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते जे मुक्त रॅडिकल्सला तटस्थ करते.
व्हिटॅमिन सीमुळे हृदयविकार, पक्षाघात आणि कमी रक्तदाबाचा धोकाही कमी होतो. सरासरी आकाराच्या लिंबाच्या रसामध्ये 31mg पर्यंत व्हिटॅमिन सी असते, तर प्रौढ व्यक्तीला दररोज 65 ते 90mg व्हिटॅमिन सी आवश्यक असते.
▪️ वजन घटवण्यात मदत करतो
काही अभ्यासांनुसार, लिंबूमध्ये असलेले पॉलीफेनॉल अँटीऑक्सिडंटमध्ये वजन कमी करण्याचे गुणधर्म आहेत. लिंबूमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करून इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारू शकतात. या दोन्ही गोष्टी टाईप 2 मधुमेहाचे मुख्य कारण मानल्या जातात.
▪️ त्वचा सुधारते
लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी हे आपल्या त्वचेवरील सुरकुत्या कमी करते. तसेच, त्वचेचा एजिंगपासून (वृद्धत्वापासून) बचाव करते आणि उन्हामुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे रक्षण करते.
▪️ पचनक्षमता मजबूत होण्यास मदत होते.
अनेक जण बद्धकोष्ठतेपासून आराम मिळावा यासाठी सकाळी लिंबू पाण्याचे सेवन करतात. कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. आयुर्वेदिक औषधांमध्ये लिंबू पाण्याने पचनक्रिया सुधारते असे सांगिण्यात आले आहे.
▪️ नैसर्गिक ब्रेथ फ्रेशनर
अनेक वेळा लसूण कांदा किंवा मासे खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येते. लिंबू पाणी प्यायल्याने श्वासाच्या दुर्गंधीची समस्या दूर होते. लिंबू लाळ उत्तेजित करते असे मानले जाते.
▪️ मुतखड्याच्या आजारामध्ये लिंबू मदत करते -
लिंबामध्ये असलेले सायट्रिक अॅसिड मुतखड्याचा धोका कमी करू शकते. खरं तर, सायट्रिक अॅसिडमध्ये सायट्रेट नावाचे संयुग असते, जे लहान-लहान मुतखड्याचे स्टोन्स फोडण्यास मदत करते.
▪️ अॅनिमियापासून लिंबू बचाव करते
लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अशक्तपणा म्हणजेच अॅनिमिया हा एक अतिशय सामान्य आजार आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला अन्नामध्ये पुरेसे लोह मिळत नाही, तेव्हा त्याला याचा त्रास होतो.
लिंबूमध्ये काही प्रमाणात लोह असते.
▪️ हृदयाला ठेवते हेल्दी
जर आपण एक लिंबू संपूर्ण खाल्ले 🤌🏻 तर आपल्या शरिराला 51% (RDA) व्हिटॅमिन सी मिळू शकते. लिंबूपाणी प्यायल्याने व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते. काही संशोधनात असे आढळून आले आहे की व्हिटॅमिन सीमुळे हृदयविकार 🫀आणि स्ट्रोक्सचा धोका कमी होतो. तसेच, जर तुम्ही लिंबू खाल्ले तर त्यामध्ये असलेले फायबर आणि प्लांट कंपाऊंड देखील हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
लिंबूचे आयुर्वेदिक फायदे
|