बातम्या

मोहरीच्या तेलाचे आयुर्वेदिक फायदे

Ayurvedic benefits of mustard oil


By nisha patil - 6/13/2024 5:45:19 AM
Share This News:



मोहरीच्या तेलामध्ये  अनेक गुण अर्थात पोषक तत्व आढळतात. मोहरीच्या तेलातून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. त्याशिवाय टोटल लिपीड अर्थात फॅट हे घटक असतात. यामध्ये फॅटी अॅसिड आणि टोटल सॅच्युरेटेडचे प्रमाणही असते. तसंच यामधून काही प्रमाणात कॅलरीजही मिळतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोहरीच्या तेलामध्ये शारीरिक स्वास्थ्य  राखणारे गुणधर्म अधिक आढळतात. त्यामुळेच याचा वापर अनेक पदार्थांमधून करण्यात येतो. जेणेकरून पोटात हे तेल जाऊन संपूर्ण शरीराला याचा फायदा मिळू शकेल.

▪️  सांधेदुखी/ हाडांचे दुखणे यासाठी फायदेशीर
आताच नाही तर अगदी कित्येक वर्षांपासून मोहरीचे तेल हे सांधेदुखी, हाडांचे दुखणे अर्थात मांसपेशी दुखत असतील तर त्यावर फायदेशीर असल्याचे सर्वांना परिचयाचे आहे. नियमित स्वरूपात मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास, शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि हाडांचे दुखणे अथवा सांधेदुखी थांबण्यास मदत मिळते. तसंच यामध्ये आढळणाऱ्या ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळेही सांधेदुखी आणि गाठींसारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. त्यामुळे सांधेदुखी अथवा हाडांचे 🦴 दुखणे चालू झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा मोहरीच्या तेलाने मालिश करा असं सांगण्यात येते. बऱ्याचदा डॉक्टरही 👨🏻‍⚕️ हा सल्ला देतात. याचा हाडांना चांगलाच फायदा मिळतो. 

▪️ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यासाठी
मोहरीमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड तसेच ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यासाठी हे तेल उपयुक्त ठरते. तसंच हृदय 🫀 निरोगी राखण्यासाठीही याचा उपयोग होतो. आपल्या शरीरात काही ना काही कारणाने अनेक विषारी पदार्थ जात असतात. पण त्याचा आपल्याला काय त्रास होतोय हे वेळेवर कळत नाही. मग अशावेळी आपण आपल्या रोजच्या जेवणात 🫕  काही प्रमाणात मोहरीचे तेल वापरल्यास शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी याची मदत मिळते. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

▪️ त्वचा मॉईस्चराईज करण्यासाठी 
त्वचेतील मॉईस्चराईजर बऱ्याचदा कमी होत असते. ज्यामुळे त्वचेवरील तजेलपणा  कमी झाल्याचे कळते. अशावेळी तुम्ही घरगुती 🏠 उपाय म्हणून मोहरीचे तेल वापरू शकता. मोहरीच्या तेलामध्ये असणारे ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी अॅसिड, विटामिन ई याचे प्रमाण जास्त असल्याने तुमची त्वचा🧏🏻‍♀️ मॉईस्चराईज करण्यासाठी उपयोग होतो. काही जणांना याचा वास आवडत नाही. मात्र याचे गुणधर्म अधिक चांगले असल्याने तुम्ही किमान आंघोळीच्या 🛀🏻 आधी अर्धा तास हे तेल त्वचेला लाऊन ठेवा आणि नियमित याचा वापर केल्यास, तुमची त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते. 
   
   ▪️ अँटिएजिंगसाठी परिणामकारक . 
मोहरीच्या तेलाने त्वचेला अधिक चांगले फायदे मिळतात. विशेषतः वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी सकारात्मक म्हणून मोहरीच्या तेलाचा उपयोग करून घेता येतो. वास्तविक एका शोधानुसार  मोहरीच्या तेलामध्ये ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी अॅसिड, विटामिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे शरीरामध्ये वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी मोहरीचे तेल फायदेशीर ठरते. चेहर्‍यावर सुरकुत्या पडत असतील तर ही समस्या कमी करण्यासाठी याचा उपयोग करता येतो. मोहरीचे तेल तुम्ही नियमित वापरून आपली त्वचा अधिक तजेलदार आणि टवटवित ठेऊ शकता. तसेच हे एक  नैसर्गिक औषध  असल्यामुळे याचा तुमच्या त्वचेला कोणताही त्रास होत नाही.


मोहरीच्या तेलाचे आयुर्वेदिक फायदे
Total Views: 3