बातम्या
बहुगुणी, बहुमोली, अमृतसमान झाडें.....
By nisha patil - 5/16/2024 12:04:53 PM
Share This News:
तासभर ऑक्सीजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट ऑक्सीजन देणाऱ्या झाडाची मात्र कत्तल करतो. भविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल.
एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.
एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.
एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.
एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.
एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.
एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2*अंशाने कमी करते.
एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.
एका झाडापासून कुटूंबासाठी लाकडी सामान तयार होते.
एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.
एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.
एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्चीपर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.
एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते.
एक झाड फळ,फुल,बिया आपल्या साठी देते.
एक झाड 50 वर्षांत काय करते आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा आम्ही मुद्दामच मांडत आहोत जेणे करून प्रत्येक माणुस ह्याचा विचार करेल.
आता नाही तर कधीच नाही.
तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.
जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण 6 महिने
पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.
बहुगुणी, बहुमोली, अमृतसमान झाडें.....
|