बातम्या

बेलफळांचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये भरपूर केला जातो.

Balfal is widely used in Ayurvedic medicine


By nisha patil - 6/9/2024 7:31:24 AM
Share This News:



तसेच या झाडाची पाने, फुले, झाडाची साल व खोडाचा गाभा याचाही आयुर्वेदिक औषधी म्हणून उपयोग करता येतो. बेलाचे झाड हे वातावरण शुद्धीकरणाचे कार्य करते. 

बेलाची पाने रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त मानली जातात. यामध्ये रेचक गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात. जे पुरेसे इन्सुलिन तयार करण्यात मदत करतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. आयुर्वेदाचार्यांशी सल्लामसलत केल्यानंतर ते सेवन केले जाऊ शकते.

पोट साफ होते 
बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास वेलाची पाने खावीत. बेलची पाने थोडे मीठ आणि मिरपूड चघळल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. ही पाने आतड्यांमधून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात, असेही म्हटंले जाते.

पचनक्रिया चांगली राहते.

बेल पोट साफ करण्याचे काम करते. यात रेचक गुणधर्म आहेत जे पाचन तंत्र मजबूत करतात. तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर बेल किंवा बेलची पाने खाऊ शकता. परंतु ती प्रमाणात खाणे गरजेतचे आहे. 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेल अतिशय फायदेशीर आहे. दिवसातून दोन वेळा बेलाच्या पानांचा रस पिल्यास मधुमेहापासून मुक्तता मिळविणे शक्य होऊ शकते. शरीराच्या वजनानुसार बेल फळाचा अर्क घेतल्यास त्याचा परिणाम दिसून येतो. कारण कौमारीन नावाचा घटक बेल फळामध्ये असल्यामुळे इन्सुलिन निर्माण करण्यासाठी बीटा पेशीला उत्तेजित करतो.

अतिसार विरोधी 

उन्हाळ्याच्या दिवसात अतिसार ही समस्या आता अधिकांश लोकांमध्ये दिसून येते. अलीकडे या रुग्णांचे प्रमाण वाढीस लागले आहेत. या परिस्थितीत उलट्या, हगवण, मळमळ वाटू लागते. बेलाच्या पाण्यात साखर मिसळून प्यायल्यास याचे लाभ दिसून येतात. किंवा कच्चे फळे खाल्यास अतिसार नियंत्रणामध्ये येतो. अर्धे पिकलेली फळ हे सर्वोत्तम मानले जाते परंतु संपूर्ण पिकलेली फळे किंवा अगदी फळाचा चूर्ण परिणामकारक परिणाम दर्शवितो.

रक्तक्षयविरोधी 
बदलत्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताच्या कमरतेचे लक्षण दिसून येतात. अशा परिस्थितीत वाळलेल्या बेलाच्या गराचा चूर्ण तयार करा. तो चुर्ण गरम दुधात रोज एक चमचा टाका आणि प्या. यामळे शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते.

ऊन लागल्यास 
जागतीक तापमानवाढीमुळे दरवर्षी उन्हाळ्यात तापमानचा पार वाढतो. दरवर्षीचा हा अनुभव असल्याने अनेकांना ऊन लागते. हा त्रास सुरू झाल्यास बेलाच्या ताज्या पानांना कुटून मेहंदीप्रमाणे तळपायावर लावावे. अशा वेळी बेलाचा शरबत प्यायल्यास तत्काळ आराम मिळतो.

बेल फळाच्या लगद्यामध्ये स्टिरॉइड्स, कूमारिन्स, फ्लॅनोनोयड्स, टेरपेनॉईड, फिनोलॉलिक संयुगे, लिग्निन, इनुलीन, आणि अन्य एंटिऑक्सिडेंट जी आपल्याला जुनाट रोगांपासून वाचवू शकतात. याव्यतिरिक्त, त्यात प्रथिने, कर्बोदके, खनिजे (कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह) आणि जीवनसत्वे (विट ए, विट बी, विट सी आणि रिबोफॅव्हिन) यांचा समावेश आहे. अॅल्कॉइड, कार्डियाक ग्लायकोसाइड आणि फ्लॅनोनोयड्स इत्यादीचा उत्तम स्त्रोत आहे. बेलफळ हे स्थानिक पारंपारिक औषधांसाठी वापरले जाणाऱ्या महत्वाच्या झाडांपैकी एक आहे.


बेलफळांचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये भरपूर केला जातो.