बातम्या

केसांचा रुक्षपणा दूर करेल केळ आणि नारळाचा हेयर मास्क

Banana and coconut hair mask will remove the roughness of the hair


By nisha patil - 6/13/2024 5:42:14 AM
Share This News:



उन्हाळ्यामध्ये केसांमध्ये खूप घाम येतो. ज्यामुळे आपले केस खराब होतात. तसेच केसांमध्ये कोरडेपणा येतो. केसांची स्थिती सुधारावी म्हणून आपण अनेक प्रकारचे प्रोडक्ट वापरतो. पण काहीही फायदा होत नाही. आम्ही तुम्हाला असा हेयर मास्क सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या केसांचे कोरडेपणा दूर होण्यास मदत होईल. नारळ आणि केळे हेयर मास्क 
हेयर मास्क बनवण्यासाठी नारळाची पेस्ट करावी. मग त्यामध्ये मॅश केलेले एक केळे घालावे. तुम्ही हवा बंद कंटेनर मध्ये हा मास्क एक आठवडा वापरू शकतात. केसांवर आणि टाळूवर हा हेयर मास्क लावावा. कमीतकमी 30 मिनिट ठेवावे. त्यानंतर केस धुवून कंगवा करावा. 
 
नारळ आणि केळे आपल्या केसांना पोषण देतात. तसेच केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवतात. नारळामध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. जे डॅमेज हेयर रिपेयर करतात. हा हेयर मास्क लावल्यास केसांमध्ये रंग चढतो. व केस मऊ बनतात.


केसांचा रुक्षपणा दूर करेल केळ आणि नारळाचा हेयर मास्क