बातम्या
सात जिल्ह्यांच्या न्यायासाठी खंडपीठ गरजेचे – आम. सतेज पाटील
By nisha patil - 2/18/2025 4:22:38 PM
Share This News:
सात जिल्ह्यांच्या न्यायासाठी खंडपीठ गरजेचे – आम. सतेज पाटील
हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे सतेज पाटील आग्रही
कोल्हापुरातील पायाभूत सुविधा उत्कृष्ट असून, भौगोलिकदृष्ट्या हे सर्वांसाठी सोयीस्कर ठिकाण आहे. त्यामुळे हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सात जिल्ह्यांतील लोकांना न्यायालयीन कामांसाठी मुंबईला जावे लागते. यामुळे नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, असेही पाटील यावेळी म्हणाले
सात जिल्ह्यांच्या न्यायासाठी खंडपीठ गरजेचे – आम. सतेज पाटील
|