बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यात 38 हजार लाभार्थ्यांना प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा लाभ
By nisha patil - 2/21/2025 5:40:52 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यात 38 हजार लाभार्थ्यांना प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा लाभ
शनिवारी मंजुरीपत्र वाटप; अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती
कोल्हापूर, 21 फेब्रुवारी – प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना टप्पा दोन अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 38,154 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. शनिवारी (22 फेब्रुवारी) दुपारी 3 वाजता दृकश्राव्य माध्यमाद्वारे लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व पहिला हप्ता वाटप करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींमध्येही हा कार्यक्रम दाखवला जाईल. जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रकाश आबिटकर असतील.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून कोणताही नागरिक घराशिवाय राहू नये, यासाठी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना सुरू करण्यात आली. महाराष्ट्रात या टप्प्यात 20 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.
लाभार्थ्यांनी शनिवार, 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता आपल्या गावातील ग्रामपंचायतीत उपस्थित राहून मंजुरीपत्र स्वीकारण्याचे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 38 हजार लाभार्थ्यांना प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा लाभ
|