बातम्या

कलिंगडचे फायदे

Benefits of Kalingad


By nisha patil - 4/27/2024 7:48:47 AM
Share This News:



नियमित कलिंगड खाल्ल्याने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच, त्याचा रस अॅनिमियाच्या बाबतीत खूप फायदेशीर ठरते.

सकाळी, रात्री हे फळ खाणे टाळले पाहिजे. यामुळे पोट बिघडू शकते.

 कलिंगडमध्ये व्हिटॅमिन 'ए' आणि 'सी' मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

शरीरात कोणत्याही प्रकारची जळजळ असल्यास कलिंगड त्यापासून आराम देते.

 कलिंगड अनेक पोषक तत्त्वांनी युक्त फळ आहे. जे कोलेस्ट्रॉल कमी करते आणि रक्तदाब नियंत्रित करते.

 मधुमेहचे रुग्ण कलिंगडपासून दूर राहतात, परंतु यामध्ये अमिनो ॲसिड सिटुलीन आणि नायट्रिक ऑक्साइड आढळतात, ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही.

उन्हाळ्यात उष्णतेमुळे ओठ कोरडे होण्यापासून वाचविते.

 उन्हाळ्यात कलिंगड खाणे अतिशय उत्तम आहे. शरीरातील पाणी वाढविते. शेतकरी उत्पादन वाढविण्यासाठी एक ठराविकमात्रापर्यंत रासायनिक खत वापरतो. परंतु कलिंगडमध्ये गोडवा अथवा लालसरपणा आणण्यासाठी काही करीत नाही. मात्र व्यापारीवर्ग कलिंगड टिकविण्यासाठी त्यावर रासायनिक प्रक्रिया करतात. त्यामुळे ग्राहकापर्यंत जाणारे कलिंगड कसे जाते, हे त्या व्यापाऱ्यावर अवलंबून असते.

 सर्वसामान्य नागरिकांना परवडेल आणि उन्हाळ्यात शारीरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे फळ म्हणजे कलिंगड आहे. किमान दोन दिवसाला एक तरी कलिंगड खावे.
खास करून महिलांनी फळ खाण्यावर भर द्यावा. 

 अतिस्वस्तात मिळणाऱ्या कलिंगडपासून सावधान राहिले पाहिजे. नीट चौकशी करूनच फळ घ्यावे. संकलित...


कलिंगडचे फायदे