बातम्या

आंघोळीच्या पाण्यात टाका लिंबाचा रस टाकण्याचे फायदे

Benefits of adding lemon juice to bath water


By nisha patil - 4/27/2024 7:51:56 AM
Share This News:



उन्हाळा सुरू झालाय, अशात लिंबाच्या रसाचे काय काय फायदे होतात हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. लोक गॅस दूर करण्यासाठी किंवा थकवा घालवण्यासाठी लिंबाच्या रसाचं सेवन नेहमी करतात. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी लिंबाचा रस किती फायदेशीर आहे हेही सगळ्यांना माहीत आहे. पण अनेकांना हे माहीत नाही की, लिंबाचा रस आंघोळीच्या पाण्यात टाकल्यावर त्याचे काय फायदे होतात. चला जाणून घेऊ याचे फायदे....

शरीराची दुर्गंधी होते दूर...
वाढत्या वयासोबत वाढत्या वजनाचा संकेत तेव्हा मिळतो जेव्हा तुमच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागते. जर कुणाच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागते तेव्हा समजून घ्या की, भविष्यात तुम्ही एखाद्या गंभीर आजाराचे शिकार होणार आहात. पण अनेकदा घामामुळेही शरीराची दुर्गंधी येऊ लागते. अशात तुम्ही आंघोळीच्या पाण्यात लिंबाच्या रसाचा वापर करावा.

सुरकुत्यासाठी होतील दूर...
आपलं शरीर एका गाडीप्रमाणे आहे. जसे आपण एखादी गाडी खरेदी करतो, तेव्हा ती सुरूवातीला चांगला मायलेज देते आणि वेळेनुसार तिच्याकडे लक्ष दिलं नाही तर ती खराब होते. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेचं आहे. वाढत्या वयासोबत जेव्हा आपण आपल्या शरीराला चांगलं पौष्टिक जेवण देत नाही तर त्वचेसंबंधी समस्या निर्माण होऊ लागतात. या ठीक करण्यासाठी तुम्ही रोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकू शकता.

त्वचेसाठी फायदेशीर...
हा एक आयुर्वेदिक घरगुती उपाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोक हा उपाय वापरतात. जो शरीरासाठी फायदेशीर मानला जातो. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे याने त्वचेसंबंधी समस्या होत नाहीत. अशात केमिकलयुक्त साबणाऐवजी लिंबाच्या रसाच्या रसाचा वापर करू शकता. 


आंघोळीच्या पाण्यात टाका लिंबाचा रस टाकण्याचे फायदे